कळायला लागल्यापासून कविता या साहित्य प्रकाराचे तुडुंब आकर्षण ! पण पाठ्यपुस्तकातल्या कविता खूपच कन्टाळवाण्या व्हायच्या ! एकतर कवितांचे रसग्रहण हा अत्याचार त्यातून कवी अनिल, कुसुमाग्रज डोक्यावरून जायचे ! कवितेमधून स्वत: व्यक्त व्हायचं हा उद्योग डोक्यात अजिबातच नव्हता ! अकरावीला सायन्सला गेलो आणि जगणं भीषण झालं. गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र इत्यादी भयानक ऋतू अवतरले ! त्यातून डोक्याची बरबादी सुरू झाली ! आपण काठावर तरी पास होणार की नाही ही भीती एकीकडे आणि दुसरीकडे, "काय मग, इंजीनियरींगला जाणार की मेडिकलला" असे विनोदी प्रश्न !
मी कविता कधी करायला लागलो हा प्रश्न अनंत वेळा पब्लिकने (म्हणजे खरं तर कुणीच नाही. पण जोवर पब्लिकला जवळ करत नाही तोवर वाक्यात जोर येत नाही) मला विचारल्याने निम्नलिखित लेख लिहिणे क्रमप्राप्तच आहे.
स्थळ : कुठलीशी कोंदट खोली आणि त्यात कोंडलेली मुलं आणि मुली. (मुली या कायमच "आणि" असतात हे "आणि" कायमच कामं सांगायच्या यादीत त्या वापरतात.)

वेळ : खराब
या साऱ्यात बारावीची बोर्डाची परीक्षा अंगावर दाण्णकन आदळली ! गणित भाग २ चा पेपर ! तोंडाला फेस आलेला ! एकही गणित ओळखीचे नव्हते ! बरं, नुसते बसून राहणे शक्यच नव्हते, कारण गणित शिकवणारे मास्तर विद्यार्थ्यांवरील प्रेमापोटी (?) फुलपाखरासारखे या वर्गातून त्या वर्गात भिरभिरत होते. उगाच मधेच एखाद्याजवळ थांबून, हं, काय जमतंय का ? यासारखे निरर्थक प्रश्न उधळत होते. पेपर सुरु होऊन अंदाजे अर्धा तास झालेला ! हा मास्तर माझ्याही वर्गात शिरला ! बरोब्बर तीन बाकं पुढच्या पोरीचा पेपर चक्क हातात घेतला ! छान, छान लिही... व्यवस्थित लिही, इत्यादी इत्यादी बडबड सुरु केली ! "पर्यवेक्षक" नावाचा पुतळा देखील, "सगळी मुलं सिन्सियर आहेत वगैरे बरळत होता ! माझे ब्लड तापायला सुरुवात झाली ! जर हा "मास्तुऱ्या" माझ्या जवळ येवोन माझा पेपर उचलता तर..... छे !!! जाऊ दे !!! नकोच तो विषय !!! मी उत्तर-पत्रिका इतक्या जवळ कवटाळली की अजून जवळ घेतली असती तर गायब झाली असती !!!
सुदैवाने "मास्तुऱ्या" माझ्याजवळ न फिरकताच, वर्गाबाहेर गेला ! मी सुटकेचा नि:श्वास टाकला !!!
बऱ्याच वेळा लोकांना भरकटणारे उनाड पोर दिसते. पण आकाशात भरकटत चाललेल्या पतंगामागे, पतंग पकडण्याच्या निश्चित उद्देशाने ते काट्याकुट्यामधून, तापलेल्या डांबरी रस्त्यावरून, वाळवण, वाळत घातलेले कपडे, कुंपणे, उनाड कुत्री, आणि होSSSSSSSSSS त्याच्यासारख्या इतर अनेक जणांबरोबर धावतेय, हे नंतर कळते म्हणा !
क्रमश:

No comments:
Post a Comment